गुरुकुल सायन्स क्लासमध्ये ‘संकल्प 2026’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
कल्याण:- प्रो. वैभव ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात येणाऱ्या गुरुकुल सायन्स क्लासमध्ये ‘संकल्प 2026’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या प्रसंगी सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर व माइंडसेट गुरु प्रो. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांना प्रमुख व्याख्याते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या प्रभावी व्याख्यानात प्रो. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी सर्व स्टाफना कार्यपद्धती, उत्पादकता (Productivity), नवीन वर्षासाठी संकल्प निश्चिती तसेच स्पष्ट व्हिजन यांचे महत्त्व सोप्या व प्रेरणादायी शैलीत समजावून सांगितले. त्यांनी लक्ष्यनिश्चिती,शिस्त आणि सातत्य यांच्या माध्यमातून यश कसे साध्य करता येते याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व टीचर,एडमिन स्टाफ,मैनेजमेंट कमिटी मधे नवीन वर्षाबाबत आत्मविश्वास,ऊर्जा व सकारात्मक विचार स्पष्टपणे दिसून आले.