देवगड तालुक्यातील उमेद अभियान व्यवस्थापक शिवाजी खरात यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्वरीत अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला भगिनी नी जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (उमेद) देवगड तालुका अभियान व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात हे दि.१४ ऑगस्ट रोजी गोगटे हॉल जामसंडे, ता. देवगड येथे आयोजित "रानभाजी खाद्य व विक्री महोत्सव" या कार्यक्रमात शासकीय कार्यालयीन कर्तव्य बजावत असताना त्यांना आमदार नितेश राणे यांच्याकडून आणि त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे बॉडीगार्ड आणि कार्यकर्ते यांनी मारहाण केली होती
या घटनेला आवाज उठवण्यासाठी आज महिला भगिनीं नी देवगड पोलिस कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.