• Total Visitor ( 84781 )

सोलापुरात बड्या उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

Raju Tapal January 20, 2023 53

सोलापुरात बड्या उद्योगपतींच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी;
सापडलं 50 कोटीचं घबाड

सोलापूर:-सोलापूरमध्ये आयकर विभागाचे विविध व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने तीन दिवस ही छापेमारी केली.या छापेमारीतुन मोठी माहिती समोर आली आहे.
आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी शहरातील रुग्णालयांवर छापेमारी केली होती. यात रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली.यामध्ये विशेषता भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. 
सोलापुरातील व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहूल कन्सट्रक्शन या ठिकाणी झडती घेतली होती. सोबतच अश्विनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणी देखील आयकर विभागाने झाडाझडती घेतली होती.
तसेच जालन्यामध्ये आयकर विभागाने शेकडो कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध शहरात एकाच वेळी 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. सर्वाधिक छापेमारी ही कारखानदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यांवर पडली होती.

Share This

titwala-news

Advertisement