• Total Visitor ( 370044 )
News photo

कर्नाटकच्या हंपीमध्ये इस्रायली महिलेसह दोघींवर बलात्कार

Raju tapal March 08, 2025 62

कर्नाटकच्या हंपीमध्ये इस्रायली महिलेसह दोघींवर बलात्कार;

इतरांना तुंगभद्रा नदीत फेकले



देशाची मान शरमेने खाली घालणारी घटना



काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तर इतर दोघांना घटनेनंतर वाचविण्यात आले आहे.



कर्नाटक :- कर्नाटकमध्ये देशाची मान शरमेने खाली जाईल अशी घटना घडली आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपीमध्ये देश-विदेशी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला आहे. पर्यटकांना मारहाण करत त्यातील इस्रायली महिलेसह दोन महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच्या तीन पुरुषांना नदीच्या पाण्यात फेकून देण्यात आले आहे.



काही अज्ञातांनी हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. एका तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. तर इतर दोघांना घटनेनंतर वाचविण्यात आले आहे.गुरुवारी रात्री ११ ते साडे अकराच्या सुमारासची घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. सनापूर तलावाजवळ ही घटना घडली आहे. आरोपींनी २७ वर्षीय इस्रायली महिला आणि २९ वर्षीय होमस्टे चालविणाऱ्या महिलेवर बलात्कार केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुषांना मारहाण करत पाण्यात फेकण्यात आले होते. ओडिशाच्या एका पर्यटकाचा मृतदेह नदीच्या पाण्यात सापडला आहे. तर अमेरिका आणि महाराष्ट्रातील दोन पर्यटक जखमी अवस्थेत सापडले आहेत.



पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरनुसार चार पर्यटक आणि एक होम स्टे संचालिका सनापूर तलावाजवळ मौजमस्ती करत होते. तेव्हा तीन जण मोटरसायकलवरून आले आणि पेट्रोल पंप कुठे आहे असे विचारले. जेव्हा होम स्टे संचालिकेने इथे जवळ नाहीय, असे सांगितले. यानंतर ते या पर्यटकांकडे पैसे मागू लागले. जेव्हा या लोकांना पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी कन्नड आणि तेलगू भाषेत बोलत शिवीगाळ करत मारहाण केली.तसेच तीन पुरुष पर्यटकांना नदीत ढकलले. यानंतर दोन महिलांवर बलात्कार करण्यात आला.शुक्रवारी सकाळपासून पोलीस नदीमध्ये बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत होते, त्याचा शनिवारी सकाळी मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement