• Total Visitor ( 726188 )
News photo

मांडा-टिटवाळ्यात २० ऑक्टोबर रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन!

Raju Tapal publisher October 13, 2026 22

मांडा-टिटवाळ्यात २० ऑक्टोबर रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन!





अशोका विजयादशमी आणि धम्मदीक्षा समारंभाचे होणार आयोजन;आर.आर.कसबे गुरुजी यांचे धम्म प्रवचन



राजू टपाल

टिटवाळा :-भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मांडा-टिटवाळा पश्चिम येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर आणि माता भीमाई परिसरात वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ अंतर्गत विशेष धम्म प्रवचनाचे आयोजन मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अशोका विजयादशमी आणि धम्मदीक्षा समारंभ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता सिद्धार्थ बुद्ध विहार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,मांडा-टिटवाळा पश्चिम,ता.कल्याण,जि.ठाणे येथे पार पडणार आहे. या वेळी आदरणीय केंद्रीय शिक्षक आर. आर. कसबे गुरुजी, कल्याण हे प्रवचनकार म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना धम्म मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या तक्षशिला शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर,माता भीमाई आणि नालंदा शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच बहुजन उत्थान सेवा समितीचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

भारतीय बौद्ध महासभेची स्थापना बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असून, संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक म्हणून महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन म्हणून डॉ.हरीश रावलिया, रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन म्हणून अॅड. सुभाष जौंजाळे आणि ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर कार्यरत आहेत.धम्मदीक्षा समारंभाचेही आयोजन

या कार्यक्रमात धम्मदीक्षा समारंभही घेण्यात येणार आहे. धम्मदीक्षा प्रमाणपत्रासाठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. परिसरातील बौद्ध बांधवांनी तसेच धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धम्म प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शाखांच्या वतीने करण्यात आले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement