जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन !
शिरूर (प्रतिनिधी):- जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले. नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ दिनकरराव पाटेकर असे होते. मराठी रंगभूमीपासून अभिनयाचा प्रवास सुरू करत त्यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपट सृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली.दमदार अभिनयामुळे,खास शैलीमुळे गुणी अभिनेत्यांमध्ये त्यांचे नाव आवर्जून घेतले जात होते. सुरूवातीच्या काळात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केले.१९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात झाली.नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
सलाम बाॅम्बे या चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.१९८९ मधील परिंदा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीसाठी मोठा टप्पा ठरला. या चित्रपटात त्यांनी साकारलेली अण्णा ही व्यक्तीरेखा विशेष गाजली.या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार , फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नायक,सहनायक , खलनायक, चरित्रनायक अशा प्रकारच्या विविध भूमिका त्यांनी केल्या.
त्यांच्या निधनामुळे नटसम्राट हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.