वाळू व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघे जेरबंद
Raju Tapal
October 25, 2021
39
वाळू व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघे जेरबंद
वाळूव्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर गोळीबार करून खून केल्याप्रकरणी दोघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट 6 पथकाने जेरबंद केले.
पवन गोरख मिसाळ वय -29 व्यवसाय खडी सप्लायर रा.दत्तवाडी उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे, महादेव बाळासाहेब आदलिगे व्यवसाय शेती रा.जुनी तांबेवस्ती दत्तवाडी ,उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे अशी व्याळूव्यावसायिकाचा खून केल्याप्रकरणी जेरबंद करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.
वाळूव्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरूळीकांचन येथील हॉटेल सोनाई समोर गोळीबार झाला होता. गोळीबारात संतोष जगताप मृत्यूमुखी पडला होता.संतोष जगताप याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता.
या घटनेबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये 22/10/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेमार्फत चालू असताना अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर रामनाथ पोकळे यांना आरोपींच्या ठिकाणाची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 6 च्या अधिका-यांना त्याबाबत माहिती देवून पथक नेमून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केल्याने त्यांच्या पथकासह त्याठिकाणी जावून पवन गोरख मिसाळ, महादेव बाळासाहेब आदगिले या दोघा आरोपींना ताब्यात घेण्याची कामगिरी केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र पाळके, विठ्ठल खेडकर,नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकाटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे,ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे,नितीन घाडगे ज्योती काळे, सुहास तांबेकर या पोलीसांनी ही कामगिरी केली.
Share This