वकिलाची कार अडवून लुटणा-या दोघांना यवत पोलीसांकडून अटक
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- वकिलाची कार अडवून अश्लील शिवीगाळ करत त्यांना लुटणा-या दोघा संशयितांना यवत पोलीसांनी अटक केली.
तुषार दत्तात्रय शेळके वय -२४ शेळके वस्ती वाखारी ता.दौंड, रोहित गोविंद कड वय -३३ वर्षे, स्टेशन रोड यवत ता.दौंड अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.
समजलेल्या माहितीनूसार,वकील मधुसूदन सदाफुले हे त्यांच्या कुटूंबासोबत वाखारीजवळ जात असताना कारमधून आलेल्या चौघांनी सदाफुले यांची एम एच १३ बी एन ९५५९ कार अडवून त्यांना पत्नी व मुली समोर शिविगाळ केली. धमकावून त्यांच्याकडून २५ हजार रूपयांची रक्कम काढून घेवून पोबारा केला.
मधूसुदन सदाफुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास करत गुन्ह्यात वापरलेल्या गाड्यांच्या नंबरवरून गुन्ह्यात वापरलेल्या दोन कारसह दोघांना अटक केली.