• Total Visitor ( 369996 )
News photo

कलंबिस्त येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या

Raju tapal March 12, 2025 51

कलंबिस्त येथे युवकाची गळफास घेवून आत्महत्या



सावंतवाडी :- कलंबिस्त-घनशेळवाडी येथे युवकाने आपल्याच अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावून आत्महत्या केली. निलेश न्हानु सावंत (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र त्याने हा प्रकार का केला आहे? याचे कारण समजू शकले नाही. या घटनेने कलंबिस्त गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत निलेश सावंत याचे काका राजन सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस हवालदार प्रसाद कदम, लक्ष्मण काळे यांनी जाऊन पंचनामा केला. निलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. निलेश याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, काका असा मोठा परिवार आहे.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement