७९ वा स्वातंत्र्यदिन गुजर प्रशालेत उत्साहात साजरा
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्या सहकारी बँकेचे संचालक , शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ,साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे, सचिन मुळे, कुणाल गुंदेचा, दत्तात्रय जाधव ,संतोष करपे, दादा घुले, विजय जेधे,तळेगावच्या विद्यमान उपसरपंच कीर्ती गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट ,सामाजिक कार्यकर्ते जावेद बागवान ,मधुकर सुतार ,नितीन मुळे, राहुल गुंदेचा, विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सचिन पंडित हे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे उपप्राचार्य सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सामूहिक कवायतीने झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण अत्यंत उत्तमरित्या समर गीतांच्या माध्यमातून केले. त्याचप्रमाणे कृतीयुक्त गीतातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचे उत्कृष्ट कामही विद्यार्थ्यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रशालेत केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही उत्साहात पार पडला. प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाने स्थापन केलेल्या बाबाजी ढमढेरे संग्रहालयासाठी ऐतिहासिक व दुर्मिळ होत चाललेली जुन्या काळातील पाच पैसे, दहा पैसे ,वीस पैसे अशी एकूण ५५ नाणी त्या संग्रहालयास भेट म्हणून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थिनी ऐश्वर्या भुजबळ व सानिका आदक यांनी केले. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी आभार मानले.