• Total Visitor ( 607833 )
News photo

कणकवली देवगड प्रांताधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी

Raju Tapal publisher June 26, 2026 20

कणकवली देवगड प्रांताधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी



सरकारी-निमसरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांना निवेदन



बिएलओच्या सभेत केला शिक्षकांचा अपमान



अमरावती/सिंधुदुर्ग :- देवगड येथे BLO चे SIR प्रशिक्षण वर्ग गुरुवार दि.२५जुनला चालू होता. सकाळी ५ वाजता उठून शाळेत गेलेले शिक्षक परस्पर SIR प्रशिक्षणाला गेले होते सकाळी ११ वाजता सुरू केलेले प्रशिक्षण २.३० वाजले तरी चालू होते. शिक्षकांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी छोटया सुटटीची मागणी केली असता संविधानिक पदावर काम करणाऱ्या प्रांताधिकारी  जगदीश कातकर यांनी असभ्य भाषेत हरामखोर शब्द वापरून कर्मचाऱ्यांचा अपमान तर केलेलाच आहे. मात्र त्या पदाची सुद्धा किंमत कमी केलेली आहे. नवपिढी घडविणाऱ्या शिक्षकांना हरामखोर म्हणणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांकडे नितीमत्ता आहे की नाही विचारणा करणाऱ्या शिक्षकांना अपमानास्पद बोलून हरामखोर तू जा इथून. याची सस्पेंडची ऑर्डर काढा. अशा अर्वाच्य भाषेत हेटाळणी केली आहे. BLO च्या कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांशी नेहमीच उद्धट आणि असभ्य भाषेत वर्तन करीत असतात. त्यामुळे देवगड तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. याप्रकारची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा BLO कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल. कर्मचा-याविरोधातील अन्यायकारक,असभ्य व अभद्र वर्तनाला सिंधुदुर्गाच्या संस्कृतीत अजिबात स्थान नाही. यावर जिल्हाधिकारी योग्य ती योग्य ती कारवाई केली नाही तर कर्मचा-याच्या रोषास तहसिल कार्यालय देवगड येथे सोमवार दि. २९/६/२०२६ रोजी लाक्षणिक आंदोलन कर्मचा-यांच्यावतीने करून त्यांच्या कृत्याचा निषेध कैला जाईल.अशा इशाराचे निवेदन सिंधुदुर्ग सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी दिला आहे. कणकवली देवगड प्रांताधिकारी जगदीश कातकर  यांनी शिक्षक समिती देवगडचे अध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तीव्र निषेध राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग यांनी केला असुन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देतांना अध्यक्ष राजन कोरगावकर,सरचिटणीस राजन वालावलकर,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,राज्य पदाधिकारी सचिन मदने व नामदेव जांभवडेकर,देवगड अध्यक्ष जयेंद्र चव्हाण,संदिप मिराशी,कणकवली अध्यक्ष सुशांत मर्गज,कुडाळ शिक्षक नेते प्रसाद वारंग,जगदीश गोगटे,श्रीकृष्ण कांबळी,आपा सावंत,संतोष तेर्से,ईश्वरलाल कदम,संजय तांबे,संतोष कुडाळकर,सचिन पवार,संभाजी पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते असे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement