• Total Visitor ( 435892 )
News photo

रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा ठाण्यात रंगणार 'जिव्हाळ्याचा मेळावा'

Raju tapal November 06, 2025 76

रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा ठाण्यात रंगणार 'जिव्हाळ्याचा मेळावा'





शाळा.. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक. शाळेतील वर्ग,बेंच शाळेचा परिसर, शिक्षक,मित्रमैत्रिणी हे सारं आयुष्यभर न विसरता येण्यासारखं. कधीही आणि  कुठेही शाळेतील सहकारी भेटले की,आपसूकच शाळेविषयी चर्चा रंगतात. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या “स्वावलंबी शिक्षण,हेच आमचे ब्रीद” या ब्रीदवाक्याचा ध्यास घेत कार्यरत असलेल्या श्रीमान आर.जी.काते विद्यामंदिर,धामणी (पंचक्रोशी) या शिक्षणसंस्थेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन स्थापन केलेल्या माजी विध्यार्थी सेवा संस्था (रजि) यांचे मार्फत आत्मीयतेचा आणि आठवणींचा मेळावा साजरा करणार आहेत. रविवार,दि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह,पहिला मजला,ठाणे महानगरपालिका मुख्यालय,पाचपाखाडी येथे माजी विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा मेळावा रंगणार आहे. या स्नेहसंमेलनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव (नाना) शिंदे,सदस्य,समन्वय समिती (दक्षिण विभाग),रयत शिक्षण संस्था,सातारा उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमास अजयशेठ बिरवटकर,चेअरमन,स्थानिक स्कूल कमिटी,ह.स.खोताते माजी चेअरमन व सल्लागार,स्थानिक स्कूल कमिटी,अंकुश शेठ काते  सल्लागार,स्थानिक स्कूल कमिटी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात मुख्यत्वेकरून ज्यांनी शाळा बांधण्याचे स्वप्न पाहिले,ज्यांनी अपार मेहनत घेऊन ते स्वप्न प्रत्यक्षात उत्रवले,ज्यांनी तिला जोपासली आणि आत्ता जे जोपासत आहे ते सर्व मान्यवर,सर्व माजी विद्यार्थी,तेव्हापासूनचे ते आजपर्यंतचे शिक्षकवर्ग आणि विध्यामंदीर आणि संघटनेचे हितचिंतक एकत्र येऊन शालेय आठवणींना उजाळा देणार असून,संस्थेच्या प्रगतीचा प्रवास पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक कार्यात सातत्य,नात्यांमध्ये आपुलकी आणि समाजाशी असलेले ऋण सन्मानाने फेडण्याचा संकल्प या स्नेहसंमेलनातून व्यक्त होणार आहे. माजी विद्यार्थी सेवा संस्था (रजि.) तर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांना,शिक्षकांना व पालकांना या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप बिरवटकर यांच्या वतीने आले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement