• Total Visitor ( 501268 )

महाविकास आघाडीच्या वतीने शिरूरमध्ये घंटानाद आंदोलन

Raju tapal September 18, 2025 76

महाविकास आघाडीच्या वतीने शिरूरमध्ये घंटानाद आंदोलन 



शिक्रापूर (प्रतिनिधी):- या प्रशासनाचं करायचं काय ? खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या वतीने शिरूर नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

शिरूर नगरपरिषद प्रशासन काळात मोठ्या प्रमाणात गलथान कारभार सुरू असून शहरातील विविध विकास कामे होण्यास विलंब होत आहे.शहरातील ७२ कोटी रूपयांची नवीन पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे संथ गतीने सुरू आहे.शिरूर शहरातील पाबळफाटा ते पाषाणमळा हे ८०० मीटरचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे.नागरिकांच्या प्रश्नांकडे मुद्दामहून दूर्लक्ष केले जात आहे. मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे शिरूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत.यासाठी हे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शिरूर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख मंगेश खांडरे, माजी नगरसेवक आंबीद शेख, अजीम सय्यद, राणीताई कर्डिले, संतोष थेऊरकर,चेतन साठे, अॅड.रविंद्र खांडरे, गीताराणी आढाव, विराज आढाव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते.



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement