• Total Visitor ( 435874 )
News photo

भाग्यश्री पानसरे क्रांतिबा क्रांतीज्योती शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मानित....

Raju tapal November 17, 2025 43

भाग्यश्री पानसरे क्रांतिबा क्रांतीज्योती शैक्षणिक सेवारत्न पुरस्काराने सन्मानित....





मदत सामाजिक संस्था नागपूर कडून राज्यस्तरीय पुरस्कार



माझ्यासाठी हा पुरस्कार एक ऊर्जास्रोत .आणखी कार्य करण्यास मिळाली प्रेरणा .....भाग्यश्री पानसरे





नांदगाव खंडे.... नांदगाव खंडे. तालुका अंतर्गत येणाऱ्या हिवरा बू. गावातील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कु.भाग्यश्री पानसरे मॅडम यांना  मदत सामाजिक संस्था कडून राज्यस्तरीय क्रांतिबा क्रांतीज्योती शैक्षणिक सेवारत्न पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व संविधान पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात  उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन मदत सामाजिक संस्था नागपूरच्या वतीने दरवर्षी  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित  करण्यात येते.हिवरा बू. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका पानसरे मॅडम या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले आहे  शैक्षणिक साहित्य निर्माण करून त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली,विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व कला विकसित करण्यासाठी मन की बात नावाचा नवोपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात धैर्य निर्माण केले,एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवसाक्षरांना साक्षर करण्यासाठी जनजागृती करणे ,साथीच्या रोगावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे ,किशोरवयीन  मुलींना विशेष मार्गदर्शन,महिला पालकांसोबत संपर्क करून त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल जाणीवजागृती करणे,निवडणूक मतदान बाबत जागृती करणे ,स्वच्छता अभियान मध्ये सक्रिय सहभाग ,गांडुळ खत निर्मिती करणे अशा अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केले.सोबत गरीब होतकरू मुलींना शैक्षणिक साहित्यांची मदत करण्यात सुद्धा नेहमी अग्रसर असतात पानसरे मॅडमच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत नोव्हेंबर मध्ये मदत सामाजिक संस्थेकडून नागपूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय संमेलनामध्ये पानसरे मॅडम यांना क्रांतिबा क्रांतीज्योती शैक्षणिक सेवारत्न राज्यस्तरीय पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि संविधान पुस्तक देऊन गौरवण्यात आले.मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी एक ऊर्जास्रोत आहे,मला शैक्षणिक कार्य करण्यास आणखी प्रेरणा मिळाली,असे मत सन्मानित झालेल्या भाग्यश्री पानसरे यांनी व्यक्त केले.या पुरस्काराचे श्रेय आई वडील,पती सतीश देशमुख,शाळेतील मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकवृंद आणि सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांना दिले..

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement