• Total Visitor ( 435897 )
News photo

काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी सर्वोनुमते भाऊराया चौधर यांची निवड....!

Raju tapal November 10, 2025 102

काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी सर्वोनुमते भाऊराया चौधर यांची निवड....!



महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिनाच्या दिवशी निवडीची घोषणा माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या नेतृत्वात बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी मागील 45 वर्षांपासून कार्यरत असणारी संघटना म्हणजे काष्ट्राईब कर्मचारी महासंघ,अश्या लढावू संघटनेच्या ठाणे जिल्हा शिक्षक संघटना कार्यकारिणी निवडीची सभा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 7 नोव्हेंबर शाळा प्रवेश दिनी म्हणजेच विदयार्थी दिनाचे औचित्य राखून कल्याण येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण प. येथे घेण्यात आली. सर्वप्रथम विदयार्थी दिनानिमित्त  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळाचे भूगोल विषयाचे तज्ञ् सदस्य,चौदाखडी पुस्तकाचे लेखक,आदर्श शिक्षक भाऊराया चौधर यांची यावेळी सर्वोनुमते कल्याण तालुका अध्यक्ष पदावर  निवड करण्यात आली. याचवेळी तरुण,तडफदार,उच्चशिक्षित असे विजय बाविस्कर यांची नियुक्ती काष्ट्राईब शिक्षक संघटना कुळगाव बदलापूर नपा विभागाचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले ठाणे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र दिलें व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुछय व शाल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संतोष गाढे कोकण अध्यक्ष, जगन्नाथ मोरे ठाणे जिल्हा माध्यमिक अध्यक्ष,किशोर भोईर सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष,अनिल राठोड,मनोज गोंधळी शहापूर अध्यक्ष,जगदीश गायकवाड सचिव शहापूर,प्रदीप जोगी भिवंडी मनपा अध्यक्ष,संजय ओंकारेश्वर कल्याण मनपा अध्यक्ष,लक्ष्मण कांबळे कार्याध्यक्ष ठाणे,धनराज जाधव शहापूर उपाध्यक्ष,दत्तू पालवे संघटक शहापूर,रतन रामटेके उपाध्यक्ष शहापूर,योगगुरू प्रमोद शिंदे,महेश वनवे कार्याध्यक्ष भिवंडी मनपा,दिलीप चव्हाण भिवंडी मनपा,आदी पदाधिकारी उपस्थित होतें. काष्ट्राईब शिक्षक संघटना कल्याण तालुका अध्यक्ष पदी भाऊराया चौधर व कुळगाव बदलापूर नपा अध्यक्ष पदी विजय बाविस्कर यांच्या निवडीचे स्वागत जिल्ह्यातील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement