• Total Visitor ( 697366 )
News photo

कोंढापुरी येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप मोठ्या उत्साहात 

Raju Tapal publisher September 09, 2026 18

कोंढापुरी येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप मोठ्या उत्साहात 



विजय ढमढेरे 



शिरूर:-शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप मोठ्या उत्साहात,धार्मिक वातावरणात करण्यात आला. अभिषेक,कलशपुजन वीणापुजन,ज्ञानेश्वरी पुजन,पारायण,गाथा पारायण,गाथापुजन, काकडा,ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,किर्तन,महाप्रसाद असे कार्यक्रम हरिनाम सप्ताह सोहळ्यात पार पडले. नामस्मरणाबद्दल आपोआप प्रेम निर्माण झाले पाहिजे असे किर्तनकार,ह.भ.प.भक्तीताई जाधव यांनी किर्तनात सांगितले. किर्तन म्हणजे आत्मकल्याणाचे साधन असल्याचे ह.भ.प. पवन महाराज शास्त्री यांनी किर्तनात सांगितले. ज्याला शास्त्र मान्य आहे त्या व्यक्तीचं जीवन सुंदर,सुसंगत आहे असे ह.भ.प.सोनाली दिदी करपे यांनी किर्तनात सांगितले. किर्तन एक वक्तृत्वकला आहे असे ह.भ.प.बाळूमहाराज गिरगावकर यांनी किर्तनात सांगितले. ज्ञानोबाराया़चा अवतार म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी संजीवनी आहे असे किर्तनकार पुरूषोत्तम महाराज पाटील यांनी किर्तनात सांगितले. कृष्णा सारखा ज्ञानी,परमपंडीत जन्माला आला नाही असे किर्तनकार,ह.भ.प.गणेशमहाराज वाघमारे यांनी किर्तनात श्रोत्यांना सांगितले. सगळ्यांना जमेल त्याचं‌ नाव परमार्थ असे किर्तनकार सुखदेव महाराज गाडेकर यांनी किर्तनात सांगितले.

किर्तनकार ह.भ.प.संभाजी महाराज पवार यांचेही किर्तन सप्ताहकाळात पार पडले. शुक्रवार दि‌.४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदीरापासून ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्यानबा तुकाराम,ज्ञानोबा माऊली तुकाराम,पुंडलिका वरदे हरी विठ्ठल असा नामघोष ग्रामप्रदक्षिणा दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी केला. जेष्ठ ग्रामस्थ डी.एल.गायकवाड,सुरेशराव जयसिंगराव गायकवाड,रामदास बापूराव गायकवाड,जेष्ठ पत्रकार विजय संभाजीराव ढमढेरे, योगेश सुरेशराव गायकवाड,माणिकराव वसंतराव गायकवाड,गणेश सुरेशराव गायकवाड,प्रकाश घाडगे,संभाजीराव जाधव,बळवंत गायकवाड,एन एम गायकवाड,विशाल पांडे,मधुकर जगन्नाथ गायकवाड,यांनी हरिनाम सप्ताह सोहळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कोंढापुरी,कवठीमळा,बुरूंजवाडी, पिंपळे जगताप,केंदूर,निमगाव म्हाळुंगी,खंडाळे येथील ग्रामस्थांसह महिला,लहान मुले किर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत बापूराव गायकवाड,शामराव गेणुजी घाडगे,तान्हाजी किसनराव गायकवाड,अंबर राधूजी गायकवाड,संपतराव आबासाहेब गायकवाड,श्रीकांत विठ्ठलराव गायकवाड,अंकुश रामदास लवांडे,अशोक मारूती दरवडे‌,मुरलीधर शंकर दरवडे‌,शिवराय म्हस्के,किरण एरंडे‌,नामदेव सरडे,बाळासाहेब अंकूशराव गायकवाड. सुखदेव आनंदराव गोगावले,संपतराव दत्तोबा गायकवाड,सागर शहाजी भोसले,अर्जून आनंदराव गोगावले या ग्रामस्थांनी हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपस्थित भाविकांना जेवणाची पंगत दिली. किर्तन संपल्यानंतर रात्री प्रत्येक दिवशी भजनी मंडळाचा हरिजागर पार पडला.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026