• Total Visitor ( 493324 )
News photo

नांदगाव सदो येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची डिजिटल शेतीशाळा संपन्न 

Raju Tapal publisher April 23, 2026 12

नांदगाव सदो येथे हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची डिजिटल शेतीशाळा संपन्न 



इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे कृषी विभाग,नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या डिजिटल शेतीशाळा अंतर्गत भात शेतीचे लागवड तंत्र या शेतीशाळेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद,इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी डिजिटल शेतीशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शेतीशाळेत भात शेतीचे लागवड तंत्र, भाताची थेट पेरणी,पद्धत,टोकण पद्धत,भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत या विषयांवर तज्ञांद्वारे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले. तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचेही शंका निरसन केले गेले. यापुढेही प्रत्येक आठवड्याला पीकनिहाय तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार डिजिटल शेतीशाळा होणार असून त्यालाही शेतकऱ्यांनी असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले. 

याप्रसंगी पानी फाउंडेशन आयोजित फार्मर कप २०२६ साठी गटशेतीची लोक चळवळ सुरु करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.  पाणी फाउंडेशन अंतर्गत डिजिटल शेती शाळामध्ये भात पीक फार्मर कप साठी गटांची निवड करण्यात आली. डिजिटल शेतीशाळेत समूहाने एकत्र येऊन गटशेती केल्यास मजुरांचा खर्च वेळेची बचत होईल. याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी काळे,सहाय्यक कृषी अधिकारी तागड,आत्मा व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदी उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement