• Total Visitor ( 449551 )
News photo

जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ८ पासून

Raju tapal January 06, 2026 67

जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव ८ पासून



तीन दिवसीय क्रीडा महाकुंभात तीन हजार विद्यार्थी करणार विद्यार्थ्यांचे कला - क्रीडेचे सादरीकरण



अमरावती:- शालेय जीवनात विद्यार्थ्यांमधील खेळ व कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक ८ ते १० जानेवारी दरम्यान श्री.शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे होणार आहे. या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन गुरूवार, दि.८ जानेवारी, २०२६ सकाळी ११ वा.विभागीय आयुक्त डॉ.श्वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र ह्यांच्या अध्यक्षेत होणाऱ्या या कार्यक्रमास विशेष अतिथी जिल्हाधिकारी आशिष येरेकर,प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण उपसंचालक निलिमा टाके,अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी,विलास मरसाळे,बालासाहेब बायस,बाळासाहेब रायबोले,प्रकल्प संचालक प्रिती देशमुख,मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार आदींची उपस्थिती राहणार आहे. या संदर्भात नुकतीच दिनांक ६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद (मा.शा) माध्यमिक मुलींची शाळा अमरावती नियोजन सभा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी सतीश मुगल व संयोजक प्रवीण खांडेकर यांनी समितीनिहाय आढावा घेत विद्यार्थ्यांचा क्रीडा महोत्सव अधिक दर्जेदार होण्यासाठी सर्वांना सूचना दिल्या. या सभेला सर्व समिती प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी,तसेच समिती सदस्य म्हणून केंद्रप्रमुख,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी सतिश मुगल,प्रिया देशमुख,सुरेश वाघमारे उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने,रजनी शिरभाते,निखिल मानकर,इम्रान खान अधीक्षक नरेंद्र गायकवाड,क्रीडा संयोजक प्रविण खांडेकर,सर्व गटशिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी तथा समस्त मुख्याध्यापक,शिक्षक वृंद जिल्हा परिषद,अमरावती यांनी केले आहे असे क्रीडा महोत्सवाच्या प्रसिध्दी समितीने कळविले आहे. या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात प्राथमिक विभागामध्ये प्राथमिक विभाग कबड्डी (मुले),कबड्डी (मुली),खो-खो (मुले),खो-खो (मुली),लंगडी (मुली),वैयक्तीक खेळ-75 मीटर धावणे (मुले),75 मीटर धावणे (मुली),लांब उडी (मुले),लांब उडी (मुली),उंच उडी (मुले),उंच उडी (मुली),माध्यमिक विभाग-कबड्डी (मुले),कबड्डी (मुली),खो-खो (मुले),खो-खो (मुली),हॉलीबॉल (मुले),हॉलीबॉल (मुली),

टेनिक्वॉईड दुहेरी (मुली),बॅडमिंटन दुहेरी (मुली),बँडमिटन दुहेरी (मुले),100 x 4 रीले (मुले),100 × 4 रीले (मुली),100 मीटर धावणे (मुले),100 मीटर धावणे (मुली)लांब उडी (मुले),लांब उडी (मुली),उंच उडी (मुले),उंच उडी (मुली),कुस्ती (मुल),गोळाफेक(मुले),बॅडमिंटन एकेरी (मुली),बॅडमिंटन एकेरी (मुले),टेनिक्वॉईड एकेरी (मुली)या खेळाचा समावेश राहणार आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement