शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक बैठक संपन्न
=================
आजी माजी शिक्षक आमदारांची उपस्थिती
अमरावती दि.५ :- महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्या दालनामध्ये शैक्षणिक विषयावर ४ जूनला बैठक आयोजित केली होती.यावेळी विविध विषयांवर मंत्री महोदय,
शिक्षक आमदार आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली संपन्न झाली.
या सभेत १५ जून २०२४ च्या संचमान्यता आदेशातील अटी शिथिल करणे बाबत पुनर्विचार केला जाईल,दुर्गम, डोंगराळ,आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विचार करावा.
विशेष म्हणजे शिक्षक झालेल्या शाळा विषयी चर्चा केली, शून्य शिक्षक संख्या झालेल्या शाळांची ९ वी १० वी ची विद्यार्थी संख्या तपासून शिक्षक दिले जातील असे ठरले, ६ ते ८ गटातील गटातील शिक्षकांचा विचार केला जाईल, संचमान्यता रिवाईज होई पर्यंत कोणत्याही शिक्षकाला सरप्लस केले जाणार नाही,तसेच कोणाचाही पगार थांबला जाणार नाही.14 ऑक्टोबर 2024 शासन आदेशानुसार निधीची उपलब्ध करून मिळावी म्हणून या पुरवणी मागणीत विषय आला पाहिजे, एमपीएससीच्या बैठकीसाठी फाईल पाठवले जाईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.शेवटच्या वर्गाची पटसंख्या 23-24 प्रमाणे धरून अनुदान द्यावे अशी मागणी केली, तपासून कारवाई केली जाईल असे सांगितले. विनाअनुदानित वरून अनुदानित बदली मान्यता देण्यासाठी तात्काळ कारवाई करावी, मंत्री महोदयांनी तसे आदेश सचिवांना दिले. सध्या सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी ट्रेनिंग बाबतीत राज्यभरातून खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या, त्या सर्व बाबींविषयी चर्चा केली, त्या सोडवण्यासाठी संचालक राहुल रेखावार यांना मंत्री महोदयांनी आदेश दिले,
जे लोक काही कारणास्तव ट्रेनिंग अटेंड करू शकले नाहीत, किंवा ट्रेनिंगला उपस्थित करून घेतले नाही, त्यांना दिवाळी ट्रेनिंग लावण्यात येईल, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनाही संधी दिली जाईल इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दर्जा वाढ दिली गेली पाहिजे, त्याकरता अटी, शर्ती शिथिल केल्या पाहिजेत.
समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात कमिटीचा शासन आदेश काढावा,सदरचा आदेश आज काढला जाईल. वस्ती शाळा शिक्षकांबरोबर राज्यातील 26000 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी याकरता मागणी केली, त्यावर स्वतंत्र बैठक लावून चर्चा करू असे मंत्री महोदयांनी सांगितले.यावेळी उपस्थित शिक्षक आमदार यांनी विविध शिक्षकांच्या,विद्यार्थांच्या समस्या मांडल्या.
या सभेला शिक्षणमंञी दादाजी भुसे,शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक सह विधानपरिषदेच्या आजी ८ व २ माजी आमदारांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते.
सदर बैठकी संबंधाने मा. आमदार विक्रमजी काळे, ॲड. निरंजनजी डावखरे, जयंतजी आसगावकर, मनीषाताई कायंदे, ज्ञानेश्वरजी म्हात्रे, किरणजी सरनाईक, सुधाकरजी अडबाले, माजी आमदार श्रीकांतजी देशपांडे, कपिलजी पाटील यांना विविध मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या राज्य शाखेकडून आवश्यक महत्त्वाच्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणे बाबत सर्व आमदारांना विनंती केली होती.