ताथवडे शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती आणि वाहतुकीचे धडे
कीर्ती राऊत यांनी प्रात्यक्षिकातून दिली सविस्तर माहिती
शिरूर :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथे सिनर्जी कंपनीच्या मार्फत कीर्ती राऊत यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सांगून सायकल वाहतुकीचे नियम पाळून कशी चालवावी हे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांची सुरुवातीला प्रारंभिक चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या व्याख्यानानंतर पुन्हा त्यांची उत्तर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या माहितीचे मूल्यमापन करण्यात आले. मुळशी तालुक्यातील मारूंजी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताथवडे येथे सिनर्जी कंपनीच्या मार्फत कीर्ती राऊत यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृतीची माहिती देऊन वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिला. पर्यावरण रक्षणासाठी सायकल गरजेची असल्याचे सांगत त्यांनी सायकलच्या बेल ब्रेक रिफ्लेक्टर कॅरेज आणि पॅडल या भागांची माहिती देऊन सायकल चालवण्यासाठी ते का आवश्यक आहेत याची सखोल माहिती दिली. याशिवाय सायकल चालवताना वाहतुकीचे कोणते नियम पाळावे हे सुद्धा कीर्ती राऊत यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. स्मिता वाळके यांनी विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी घेतली व त्यांचे मूल्यमापन केले. यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक संगिता सूर्यवंशी, कविता मोहिते,भारती जाधव,अनामिका मांडवगडे,जयश्री दांगडे,सारिका भालेकर,प्रियंका कावरे,मुकूंद गावडे आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. मारुंजी केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी केले. तर मुकूंद गावडे यांनी आभार मानले.