जनसेवेचा वसा जपणारे आरोग्यदूत विकास अशोक शिंदे यांचा सन्मान
शिरूर (प्रतिनिधी):- विकास अशोक शिंदे यांच्या समाजसेवा,आरोग्यसेवा आणि गोरगरीब जनतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तपोवन,मोशी येथे पूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज,श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे नवनियुक्त महासचिव,यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. आळंदी ते पंढरपूर वारीतील वारकऱ्यांची आरोग्यसेवा असो,अथवा ससून हॉस्पिटलसह पुण्यातील कोणत्याही रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना येणाऱ्या अडचणी असोत,विकास शिंदे हे सदैव मदतीसाठी तत्पर असतात. ग्रामीण रुग्णालयापासून ते ससून हॉस्पिटलपर्यंत एखाद्या गरजू रुग्णाला अडचण निर्माण झाली,तर एका फोनवर धावून जाऊन शक्य ती सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. शिक्रापूर येथे श्री समर्थ पॅथॉलॉजी लॅब आणि सुखकर्ता मेडिकलच्या माध्यमातूनही ते सर्वसामान्य व गरजू रुग्णांना माफक दरात तसेच अनेकदा विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. व्यवसायासोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत त्यांनी ‘सेवा हीच खरी साधना’ या भावनेने आपले कार्य सुरू ठेवले आहे. गोरगरीब,गरजू आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणारे जनसेवक,समाजसेवक आणि आरोग्यदूत विकास अशोक शिंदे यांचा झालेला हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव आहे. त्यांच्या या निःस्वार्थ समाजसेवेला तसेच त्यांच्या हातून भविष्यातही अशीच निरंतर जनसेवा घडत राहो आणि समाजातील अधिकाधिक गरजूंपर्यंत त्यांच्या सेवेचा लाभ पोहोचो अशी सदिच्छा शिक्रापूर परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून पुढील समाजसेवी वाटचालीस नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.