• Total Visitor ( 623341 )
News photo

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन 

Raju Tapal publisher July 01, 2026 37

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन 



पुणे:- पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जात. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव.१९९९ ते २००२ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते.पुणे शहरातील विद्यार्थी चळवळ,पुणे विद्यापिठावरील त्यांची अनेक आंदोलने गाजली.काॅंग्रेस नेते प्रा.रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक होते. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या १९९२ ते १९९८ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्या,महिला बालकल्याण समितीच्या सभापती होत्या.२०१५ ते २०१८ दरम्यान जालिंदर कामठे हे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष होते.स्वर्गीय वसंतदादा पाटील हे त्यांच्या गुरूस्थानी होते. त्यांच्या नावाने त्यांनी कोंढवा येथे शाळा सुरू केली.काॅंग्रेस पक्ष फुटल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली.त्यावेळी जालिंदर कामठे यांनी शरद पवार यांची बाजू घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या समर्थकांची पहिली बैठक जालिंदर कामठे यांच्या क्विन्स गार्डन येथील बंगल्याच्या आवारामध्ये झाली होती असे समजते. जेष्ठ साहित्यिक दशरथराव यादव यांनी जालिंदर कामठे यांच्या निधनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,ओम शांती! असे म्हटले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement