• Total Visitor ( 435915 )
News photo

गणोरी केंद्राची शिक्षण परीषद ब्राम्हणवाडा गोंविदपूर येथे संपन्न

Raju tapal September 04, 2025 75

गणोरी केंद्राची शिक्षण परीषद ब्राम्हणवाडा गोंविदपूर येथे संपन्न



शिक्षण परीषद व शाळेतील विविध उपक्रमाची माहीती सादर



अमरावती :- शिक्षण विभागाच्या आदेशानुसार विविध विषयाची माहीती देण्याकरीता केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात येते.यावेळी गणोरी केंद्राची शिक्षण परिषद २९आॅग्रस्टला जि.प.माध्यमिक आदर्श शाळा ब्राम्हणवाडा गोविंदपूर,पं.स.अमरावती येथे घेण्यात आली.

या शिक्षण परिषदचे उद् घाटन गणोरी केंद्राच्या केंद्र प्रमुख निता सोमवंशी,केंद्र प्रमुख डाखोळे आणि शाळेचे मुख्याध्यापक रविद्र निंघोट यांनी छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करुन करण्यात आले. यावेळी गणोरी केंद्रातर्फे मुख्याध्यापक रविद्र निंघोट व केंद्र प्रमुख डाखोरे यांचा शाल व फुलगुच्छ देऊन करण्यात आला. शाळेतर्फे निता सोमवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविद्र निंघोट यांनी शाळेची कायापालट व विविध शाळेतील उपक्रमाची माहीती दिली. सुसज्ज कार्यालय,प्रथोमोचार कक्ष,संगणक कक्ष,डीजीटल वर्ग खोल्या,सुंदर पळसबाग,पिंक रुम,वाचनालय,स्वच्छतागृह,शालेय पोषण आहार कक्ष तसेच सुंदर विविध वृक्षांनी सज्ज असणारा शालेय परीसर यांची गणोरी केंद्रातील शिक्षकांनी पाहणी केली. असे विविध उपक्रम गणोरी केंद्रातील शाळेत राबवावीत या करीता या शाळेला भेट देऊन शिक्षण परीषदचे आयोजन केले होते अशी माहीती केंद्र प्रमुख निता सोमवंशी यांनी दिली. यावेळी मागील महिन्याचा आढावा तसेच Scholarship सराव चाचणी प्रश्न पत्रिका विश्लेषण व पुढील नियोजन ५ मार्च शासन निर्णय नुसार निपुण महाराष्ट्र अध्ययन स्तर स्थिती. प्रत्यक्ष VSK पोर्टल वरील आपल्या केंद्राचा data दाखविणे, चर्चा व पुढील नियोजन PAT पायाभूत चाचणी संबंधी प्रश्न पत्रिका तपासणे गुणदान व तपासलेल्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दाखविणे याबाबत आढावा व अध्ययन निष्पत्ती व प्रश्नप्रकार या संबंधी चर्चा



मागील महिन्यात केलेल्या मासिक नियोजनावर चर्चा.



शाळा यशोगाथा लेखन, यशोगाथांचे दस्तएवजीकरण व सादरीकरण

देवाण - घेवाण



मासिक नियोजनानुसार वर्गात झालेल्या वेगवेगळ्या उपक्रम व यशस्विता आणि अडचणी बाबत शिक्षकांचे सादरीकरण आणि चर्चा. नाविन्यपूर्ण कामाचे सादरीकरण ज्यांचे वर्ग व शाळा निपुण आहेत त्यांचे अभिनंदन व कौतुक



मासिक नियोजन



माहे सप्टेंबर 25 चे मासिक नियोजन करून घेणे (नमुना या पत्रासोबत जोडला आहे त्याचा वापर करावा.)



पालक सहभाग, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग



गुणवत्ता वाढीसाठी पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय यांचा कसा सहभाग घेण्यात आला याबाबत ची यशस्विता व अडचणी आढावा व चर्चा (SMC बैठकीचे नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणात पालक व समाज सहभाग नियोजन- माहे सप्टेंबर 25 करिता) जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या लिंक वर माहिती भरणे. स्थानिक इतर विषय (गरजेनुसार) तसेच केंद्रस्तरीय स्थानिक इतर विषय (गरजेनुसार) विविध विषयावर केंद्र प्रमुख निता सोमवंशी यांनी केले. तसेच निपुन अंतर्गत पर्यवेक्षकीय यंञने मार्फत प्रत्येक शाळेच्या विद्यार्थांची आॅनलाईन चाचणी घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सुञसंचालन अभिषेक खांडे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन येलोने यांनी मानले. यावेळी ब्राम्हणवाडा गोविंदपूर शाळेचे हरीभाऊ जावळे,अंजली नाखले,संगिता डाफ,गायत्री वलिवकर या शिक्षकांचे सहकार्य लाभले असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement