• Total Visitor ( 428352 )
News photo

ग्लोबल व्हिजन फाऊंडेशनच्या परिमल प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन उत्साहात 

Raju tapal December 29, 2025 437

ग्लोबल व्हिजन फाऊंडेशनच्या परिमल प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन उत्साहात 

            

शिक्रापूर:- ग्लोबल व्हिजन फाऊंडेशन संचलित परिमल प्री-प्रायमरी स्कूलचे उद्घाटन २५ डिसेंबर २०२५ रोजी शिक्रापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पार्वती उमाप आणि  बाबुराव उमाप यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. ग्लोबल व्हिजन फाऊंडेशनचे सीईओ धनंजय परकाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ग्लोबल व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष कांतीलाल उमाप,अॅड राजेंद्र उमाप,प्राचार्य रामदास थिटे,सचिन विरवाले,निलेश थोरात,उपाध्यक्ष रजनी उमाप,देवेंद्र कोळपकर,शेवाळे सर तसेच शिक्रापूर परिसरातील आणि एक ग्राम मधील बालक व पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. याप्रसंगी प्रिन्सिपॉल निशा माने,शिक्षिका अनुक्रमे सुषमा वर्मा,सारिका भवर,राणी धुमाळ,पूर्वा काळे, माधुरी विरवाले,अश्विनी फाळके,स्वाती चौगले,स्वाती देसाई,नूतन गायकवाड,नवले ताई,मावशी कविता मोरे उपस्थित होत्या. दिग्दर्शक व सिने-नाट्य अभिनेते श्रीदेवीप्रसाद सोहनी यांचे मार्गदर्शनात्मक व मनोरंजक सत्र. त्यांनी आयडिया ची कल्पना,अकल बडी या भैस,दिखावा करना है भाई,मन की आँखे खोल,जो जीता वही सिकंदर आणि कौन किसका (विचारप्रवर्तक उपक्रम) अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना अभिनय,हावभाव,कृती,शब्द आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगितले. देवीप्रसाद सोने यांनी घेतलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. दिपाली शेळके यांनी स्वागत केले,श्रावणी निकम ढोकले व गणेश बांगर यांनी सुत्रसंचलन केले आणि आभार मानले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी परिमल प्री-प्रायमरी स्कूलच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement