टाटा मोटर्स हरित शाळा पुरस्काराने हरी उद्धव धोत्रे विद्यालय सन्मानित
शिक्रापूर :-टाटा मोटर्सच्या पिंपरी कंपनीमध्ये २७ मार्च २०२६ रोजी झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात फुलगाव (ता.हवेली) येथील हरी उद्धव धोत्रे विद्यालयास द्वितीय क्रमांकाचा ४ लाख रुपये व सन्मान पत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी टाटा मोटर्सचे कुट्टी,अग्रवाल,सतीश आवटे,बाबाराव यांचे सह विविध डिपार्टमेंटचे हेड उपस्थित होते. यावेळी फुलगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय धोत्रे,उपाध्यक्ष नारायणराव खूळे,प्रवीण रायसोनी,खजिनदार नामदेवराव वागस्कर,मुख्याध्यापक सतीश केकाण,कलाशिक्षक श्रीरंग जाधव सर व विद्यार्थी साईराज वागस्कर,राजनंदिनी शिंदे उपस्थित होते. यावेळी टाटा चा हॅरिअर व सफारी मॉडेल प्लॅन्ट दाखविण्यात आला. या विभागात २ हजार मुली कार्यरत आहेत. हा विभाग फक्त मुलीच चालवतात. दर ३ मिनिटांत १ गाडी तयार होते. तसेच ३०० मूकबधिर कर्मचारी येथे कार्यरत आहेत. खूप मोठी कँटीन असून नाश्ता व जेवण अतिशय स्वादिष्ट होते. कंपनीतील सुरक्षा व्यवस्था मुलीच पाहात असून खूपच वाखाणण्यासारखी आहे.