गुजर प्रशालेत हिंदी दिन उत्साहात साजरा
विद्यार्थिनींकडून "एक मेरे वतन के लोगो" या गीताचे सादरीकरण
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत राष्ट्रीय हिंदी दिन शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंदी दिनाचे औचित्य साधून प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंदी विभागातर्फे करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या उपशिक्षिका सुवर्णा सूर्यवंशी यांनी केले. प्रशालेच्या विद्यार्थिनी श्रावणी औटी,तृप्ती चौधरी,आरती बिडवे,निर्मळ गोसावी यांनी हिंदी गीत यावेळी सादर केले तसेच स्वरांजली जाधव व आकांक्षा बनसोडे या विद्यार्थिनींनी "ए मेरे वतन के लोगो" या गीताचे सादरीकरण केले तर श्रावणी शेळके, श्वेता भोसले, सिद्धी खुरपे यांनी हिंदी जन जन की भाषा आहे हे हिंदीचे महत्त्व पटवून देणारे गीत विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
यावेळी हिंदी वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेत प्रशालेचा विद्यार्थी चेतन कुरकुरे आनंदी टोंनगे,स्नेहल केदारी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक वक्तृत्व स्पर्धेत पटकावले.
यावेळी प्रशालेच्या विद्यार्थिनींनी अत्यंत उत्कृष्ट नाटक सादर केले. "हिंदी की आत्मकथा" हे नाटक रिया शिंदे, आरोही ढमढेरे, आर्या नरके, तन्वी खैरे,श्रेया नरके, आर्या गाडे, श्रुती लवांडे, आर्वी ठोंबे यांनी सादर केले तर हिंदी बीमार हे ह्या नाटकाचे सादरीकरण इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी शिवानी गव्हाळे, नव्या शिंदे प्रिया सगट,नंदिनी राठोड,अक्षरा मोडे भांगरे स्नेहा नायनेवाड, पूजा कुऱ्हाडे यांनी केले.
यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे व प्रशालेचे उपशिक्षक शिवाजीराव आढाव यांनी हिंदी भाषेचे महत्व मनोगतातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या उपशिक्षिका सुरेखा बलाई यांनी केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेच्या उपशिक्षिका जया पुजारी यांनी आभार मानले.