जि.प.शाळा दिवानखेडला आयडीबीआय बँके कडून काॅम्पूटर लाॅब
अमरावती/तिवसा-पंचायत समिती तिवसा मधिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिवानखेड येथे कॉम्पुटर लॅब उदघाटन सोहळा दिनांक १२आॅगस्टला थाटात पार पडला.
IDBI बँकेच्या सौजन्याने कॉम्पुटर लॅब उपलब्ध करून देण्यात आली तसेच ज्ञानदेव विद्यालय पिंपरखुटा तर्फे साऊंड सिस्टिम शाळेला भेट देण्यात आली या अनुषंगाने उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मा.बागडे (शाखा प्रमुख), मा. डॉ. नितीन उंडे (गट शिक्षणाधिकारी तिवसा), मा. चंद्रशेखर रामटेके (शि.वि.अधिकारी तिवसा), मा. अंकुश पवार सर, सोनल गुजार मॅम (बँकअधिकारी ) सरिताताई काठोळे मॅम (कें.प्रमुख मार्डी), मा. जगदीशभाऊ हुंडीवाले (शा.व्य.सअध्यक्ष), मा अनुष आमले (ग्रामसेवक) मा. गौरखेडे सर, मा बाळूभाऊ उईके (सरपंस),शा.व्य.समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मा. गजाननकळंबे सर (मुख्या) आदी मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे मॅम यांनी केले तसेच मा. कळंबे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून बँकेच्या कार्याचा गौरव केला. मा उंडेनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले, कुचे मॅमनी उपस्थितांचे आभार मानले.
====================