• Total Visitor ( 134469 )

कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण सामान्य प्रशासन विभाग        

Raju tapal February 13, 2025 30

कल्याण डोंबिवली महानगरपालिका,कल्याण
सामान्य प्रशासन विभाग        

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, यांचेकडील पत्र क्रमांक – न्यायाप्र२०२३/प्र.क्र.४८/सआक, दिनांक १२ जुर्ले २०२४ च्या आदेशान्वये "मा.उच्च न्यायालयाच्या आदेशात वाल्मिकी मेहत्तर व रुखी या जाती प्रवर्गातील सफाई कामगाराच्या सोबत अनुसुचित जाती व नव बौध्द प्रवर्गातील सफाई कामगारांच्या पात्र वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यापासून सुट देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अनुसुचीत प्रवर्गातील ६६ पात्र उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेनुसार  महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
 या ६६ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांना "लिपीक टंकलेखक" पदावर, ११ उमेदवारांना "शिपाई" पदी व उर्वरीत ४३ उमेदवारांना "सफाई कामगार" पदावर नियुक्ती देण्यात आली असल्याने सदर उमेदवारांचा आनंद व्दिगुणीत झालेला दिसून आला.
 

Share This

titwala-news

Advertisement