महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीची जिल्हा कार्यकारीणी सभा संपन्न
१५मार्च २०२४च्या संचमान्यतेच्या अन्यायकारक शासन निर्णया विरोधात जनआंदोलन उभारणार
अमरावती :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची जिल्हा व तालुका कार्यकारिणी सभा अमरावती येथे शनिवार दि,३०आॅग्रस्टला पार पडली. सभेमध्ये सर्व जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थीत होते.
या सभेत १५मार्च २०२५चा शिक्षक संचमान्यतेचा अन्यायकारक शासन निर्णया विरोधात जनआंदोलन उभारण्याचा तसेच राज्य शाखेच्या आदेशानुसार आंदोलन करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. वैद्यकिय देयके, पेंडिंग ईतर थकबाकी बिले,प्रोत्साहन भत्ता, संच मान्यता, अतिरिक्त होणारी पदे, विषय शिक्षक समस्या, पदोन्नती,शालेय अनुदान,सभासद नोंदणी अभियान,तालुका अधिवेशन तसेच सेवा निवृत्त शिक्षकांच्या समस्येवर चर्चा करून काय उपाययोजना करता येईल यावर राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी यांनी विचार मांडले. विद्यार्थी, गुणवत्ता, आँनलाईन कामे, ॲप डाऊनलोड कामे यावर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांनी कोणतीही अशैक्षणिक कामे करु नये अशा ठराव सभेत घेण्यात आला. राज्यस्तरावरील शैक्षणिक विद्यार्थी हिताचे उपक्रम जिल्हात शासन परीपञ प्रमाणे राबविण्यात यावे. जिल्हावर इतर उपक्रम राबविण्यात येऊ नये अशा ठराव घेऊन तसे निवेदन प्रशासनाला देण्यात यावे.
या सभेला मा.गोकुलदासजी राऊत सर (शिक्षक नेते),मा.अजयानंदजी पवार जिल्हाध्यक्ष),मा.राजेशजी सावरकर (राज्य प्रसिद्धी प्रमुख),मा.सदानंदजी रेवाळे (जेष्ठ मार्गदर्शक),मा.शैलेंद्र स.दहातोंडे (जिल्हा सरचिटणीस),मा.प्रशांतजी निमकर (जिल्हा कार्याध्यक्ष),मा.नंदकिशोरजी पाटील (जिल्हा कोषाध्यक्ष),मा.मनिषजी काळे (जिल्हा सचिव),मा. सरिताताई काठोळे मॅडम (जिल्हाध्यक्ष महिला),मा.भावनाताई ठाकरे(जिल्हा कोषाध्यक्ष),मा.आल्हादजी तराळ(जिल्हाध्यक्ष, पेंशन सेल),मा.प्रेमसुखजी ठोंबरे (जिल्हा सरचिटणीस, पेंशन सेल),मा.निलेशभाऊ कांडलकर (जिल्हा कार्याध्यक्ष,पेंशन सेल),मा.पंकजभाऊ दहिकर (जिल्हा कोषाध्यक्ष, पेंशन सेल) तसेच सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष,कोषाध्यक्ष व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते. तालुकाध्यक्ष तुळशिदास धांडे,गजानन कावलकर,रामदास भाग्यवंत,योगीराज मोहोड,राजेश ठाकरे,उमेश चुनकीकर,नितिन देशमुख,जगदिश वानखडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेला पं. स. चांदूरबाजार तालुक्यातून रत्नाकर पडोळे तालुकाध्यक्ष, विजय राऊत सेवा निवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष, जयेश दाभाडे कार्याध्यक्ष , रामेश्वर आठवले कोषाध्यक्ष, राजेन्द्र निंभोरकर उपाध्यक्ष, संजय खरबडे उपाध्यक्ष, सुधाकर तंतरपाळे संघटक, सागर वाकोडे, सतीश वानोस्कर सदस्य उपस्थीत होते.