विषय पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करा
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शालेय शिक्षण विभागाला निवेदन
अमरावती- विशेष शिक्षकांना लागू करावयाच्या वेतनश्रेणी बाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षण मंञी दादाजी भुसे,शालेय शिक्षण राज्यमंञी डाॅ.पंकज भोयर,शालेय प्रधान सचिव रणजित सिंग देओल,सह.आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग,प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी,शिक्षण उपसचिव आबासाहेब कवळे यांना निवेदनाव्दारे केली आहे.असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
समान शैक्षणिक अर्हता व गठीत अभ्यास समितीची शिफारस लक्षात घेऊन राज्यातील १००% विषय पदवीधर शिक्षकांना सामान न्याय तत्त्वानुसार एस-१४ वेतनश्रेणी लागू करणे करण्यात यावी अशी शिक्षक समितीने केली आहे.विशेष शिक्षकांना समायोजित करताना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार वेतनश्रेणी लागू करण्याचे शासन निर्णय दि. ०८ ऑक्टोबर २०२४ मध्ये नमूद असल्या नुसार पदवी अर्हता असणाऱ्या समायोजित विशेष शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी अनुज्ञेय करण्याचे स्वयंस्पष्ट पत्र निर्गत केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून शासनाप्रती आभार व्यक्त केले आहे.सोबतच इयत्ता ६ वी ते ८ वीला अध्यापन करणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी न्यायसंगत आहे. परंतु दि. १३ ऑक्टोबर २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार विषय निहाय १/३ शिक्षकांनाच वेतनश्रेणी अनुज्ञेय करून समान कामासाठी समान वेतनाच्या धोरणाला हरताळ फासला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सह अन्य शिक्षक संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर मा. आयुक्त (शिक्षण) यांचे अध्यक्षतेत गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने सुद्धा सर्व विषय पदवीधर शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील एस-१४ श्रेणीची शिफारस केली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विषय पदवीधर शिक्षकांना न्याय देण्याबाबत वेळोवेळी आश्वस्त केले. मात्र अद्यापही अन्यायकारक असे १३ ऑक्टोबर २०१६ चे परिपत्रक रद्द करून समान वेतनश्रेणी लागू केलेली नाही. ज्याप्रमाणे विशेष शिक्षकांच्या संबंधाने शासनाने अनुकूल निर्णय घेतला तसाच निर्णय शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांच्या संबंधाने का घेतला जात नाही हे अनाकलनीय व क्लेशकारक आहे.म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आग्रही विनंती करण्यात आली की इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विषय पदवीधर शिक्षकांच्या एस-१४ वेतनश्रेणीबाबत अनुकूल निर्णय घेऊन न्याय द्यावा.अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर,राज्य नेते उदय शिंदे,राज्य सल्लागार विजयकुमार पंडित,महादेव पाटील माळवदकर,राज्य उपाध्यक्ष राजन सावंत,आनंदा कांदळकर,विलास कंटेकुरे,राज्य कार्याध्यक्ष सयाजी पाटील,राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर,राज्य संघटक राजेंद्र खेडकर,सुरेश पाटील, राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील,सतिश सांगळे,राज्य संपर्क प्रमुख किशन बिरादार,राज्य प्रवक्ता नितीन नवले,राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर,राज्य ऑडिटर पंडित नागरगोजे,महिला आघाडी प्रमुख वर्षाताई केनवडे,नपा-मनपा आघाडी प्रमुख सुधाकर सावंत,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर,ऊर्दू आघाडी प्रमुख सैय्यद शफीक अली यांनी केली आहे.