• Total Visitor ( 409676 )
News photo

तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा 

Raju tapal February 28, 2026 65

तळेगाव ढमढेरे येथील गुजर प्रशालेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा 



शिक्रापूर :- तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी.गुजर प्रशालेत विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे व ज्येष्ठ शिक्षक रवींद्र सातपुते यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. प्रशालेच्या उपशिक्षिका अर्चना गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विज्ञान विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी व विज्ञानाविषयी अधिकाधिक माहिती मिळावी,या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आनंदी टोणगे,सुमित बनकर,यश माळी व आरोही कुंभार या प्रशालेतील विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगणारी प्रभावी भाषणे केली. तसेच वैज्ञानिक ओवी सादरीकरणाच्या माध्यमातून सुप्रिया कंगले,मानवी बालकुंदे व स्वरा गागरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित करत उत्कृष्ट सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक गौतम जाधव यांनी तर आभार सोनाली शेळके यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते,ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी या कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement