उत्तमसरा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा
नवगतांचे स्वागत,पाठ्यपुस्तक,शालेय गणवेश,बुट,शाॅक्स आणि लेखन साहीत्याचे वाटप
अमरावती/भातकुली :- जि.प.प्राथमिक शाळा उत्तमसरा पं.स.भातकुली येथे मोठ्या उत्सवात प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला.शाळा प्रवेशोत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी राबविण्यात येते. नविन शैक्षणिक सञ आज २३जून पासुन सुरु झाले.पहील्या वर्गात शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणार्या चिमुकल्यांच्या स्वागता करीता शाळेने जय्यत तयारी केली होती.यावेळी नवगतांचे स्वागत,पाठ्यपुस्तके,शालेय गणवेश,बुट,शाॅक्स आणि लेखन साहीत्याचे वाटप करण्यात आले. भोजणात मसालाभात व लंड्डु देण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमसरा गावाचे आदर्श सरपंच तथा व्यवस्थापन समितिचे सदस्य धर्मेंद्रजी मेहरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नदिप सवाई,उपाध्यक्ष प्रियाताई मानकर,पोलीस पाटिल सचिनभाऊ सवाई,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वनिता जोगी, अंगणवाडी सेविका अनुराधा भिंगारे,जयश्री पेटेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी इंगळे,स.शि.राजेश सावरकर,गजानन येलोने,प्रमोद कांबळे,श्रध्दा बोबडे उपस्थित होत्या.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती साविञिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हारार्पण करण्यात आले.
शाळेतील सर्व विद्यार्थांना पाठ्यपुस्तके,शालेय गणवेश,बुट,शाॅक्स आणि लेखन साहीत्य वाटप करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थांच्या चेहर्यावर मोठा उत्साह दिसत होता.शालेय पोषण आहारात आज मसालाभात व लंड्डुचे वाटप करण्यात आले.नव्याने प्रवेश घेणार्या विद्यार्थांचे पालक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मिनाक्षि इंगळे यांनी केले तर सुञ संचालन गजानन येलोने आणि आभार प्रदर्शन राजेश सावरकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शाळेचे शिक्षक,पालक दुर्गा आकाश वानखडे,ममता बोरेकर सिमा भडके,रुपाली मालधुरे,अर्पना झाडे,मंदाताई सवाई यांचे सहकार्य लाभले.
=======================
शिक्षक राजेश सावरकर यांच्या कडून लेखन साहीत्याचे वाटप
दरवर्षि शाळेतील सर्व विद्यार्थांना स्वखर्चाने नोटबुक,पेन्सिल सह साहीत्य असणारे पाउच वाटप केले.त्यांच्या या दरवर्षीच्या उपक्रमाचे गावचे सरपंच धमेन्द्र मेहरे यांनी गोरोवउदगार काढून त्यांचे स्वागत केले.
=====================