विदर्भातील शाळा २३ जून सोमवारला सुरु होणार
प्रत्येक जिल्ह्यात आता शाळा प्रवेशोत्सव कक्ष!
कक्षात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची होणार नेमणूक
शाळा भेटीचा अहवाल स्कूल पोर्टलवर
अमरावती :- नवीन शैक्षणिक सत्रात राज्यातील शाळा १६ जून पासून सुरू झाल्या आहे. तर,विदर्भातील शाळा २३ जून सोमवार पासून सुरू होत आहेत. येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेश ोत्सव हा उपक्रम साजरा करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच प्रत्येक जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.तर विदर्भात २३ जून पासून शाळा सुरू होत आहे. शाळा प्रवेश ोत्सव या उपक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
या कक्षामध्ये आवश्यक कर्मचारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. विदर्भात शाळा २३ जून पासून सुरू होत असल्याने २१ व २२ जून २०२५ रोजी हा कक्ष सतत सुरू राहणार आहे. याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शाळा प्रवेशोत्सव बाबत आवश्यक पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्यात आले असून मागितलेली माहिती तात्काळ द्यावी लागणार आहे. राज्यस्तरावरून यावर्षी पहिल्यांदाच शाळा प्रवेशोत्सव कक्ष स्थापन होत आहे. विशेष म्हणजे शाळा प्रवेशोत्सव या उपक्रमाची माहिती तात्काळ त्याच दिवशी वरिष्ठ स्तरावर द्यावी लागणार असल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला शाळा प्रणालीमध्ये शाळा भेटीचा अहवाल नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २३ जून रोजी भेट देणारे लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांच्या भेटीच्या अहवालाची नोंद त्याच दिवशी तात्काळ शाळा प्रणालीमध्ये करावी लागणार आहे. ही सुविधा प्रवेशोत्सवाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता बंद होणार असल्याने तत्पूवी सर्व माहिती शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे.
=================
शाळा पाच दिवस सकाळी
विदर्भात २३ जून रोजी शाळा सुरू होत आहेत त्यामुळे २३ जून ते २८ जून या पाच दिवस शाळा सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी ७. ते ११.४५ या कालावधीत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २९ जून रोजी रविवार असल्याने सुट्टी राहील. ३० जून पासून शाळा नियमित वेळेवर सुरू होणार आहेत.
=====================
२१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याचे आदेश
दर वर्षी दिनांक २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीही जिल्ह्यातील सर्व शाळांमधून दिनांक २१ जून 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' म्हणून साजरा करणे अपेक्षित आहे. सध्या शाळांना ग्रीष्मकालीन सुट्या सुरू असल्याने शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी सदर कार्यक्रमाकरिता शाळेत उपस्थित राहतील याबाबत नियोजन करण्याकरिता सर्व मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशीत करावे.
तसेच शासनाकडून याबाबत प्राप्त होणाऱ्या सर्व निर्देशांचे पालन करावे. विशेषत: कोविड विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाकडून प्राप्त काळजी घ्यावायच्या सुचनांचे कटाक्षाने पालन करावे. कार्यक्रमाचा अहवाल तसेच छाया चित्रे या कार्यालयास सादर करावे असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे.
======================