पूर्व प्राथमिक विद्यामंदिर शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
छत्रपती शिक्षण मंडळाचे,
पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे 19 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेत अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती. शिवाजी महाराज यांची शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त शाळेच्या परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी बालवाडी विभागातील मुले छत्रपती शिवरायांचा वेश करून आले होते तर काहीजण मावळ्यांचा वेश परिधान करून आली होती. तसेच मुली जिजाऊ साहेबांचा व सईबाईंचा वेश परिधान करून आल्या होत्या. तसेच महिला पालकही पारंपारिक वेशात उपस्थित होत्या. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका नम्रता चौधरी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. शिवजयंती निमित्त शाळेच्या परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी प्रत्यक्षात घोडा आणून घोड्यावरून बाल शिवरायांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने पालक सहभागी झाले होते. मिरवणुकीत बालवाडी विभागातील मुलांनी व शिक्षकांनी शिवरायांच्या घोषणा दिल्या. छोट्या शिशुतील विद्यार्थिनीने शिवरायांवर आधारित भाषण केले . तर मोठ्या शिशुतील विद्यार्थ्याने शिवगर्जना सादर केली. ढोल ताशांच्या आवाजात वेगळेच वातावरण तयार झाले होते. मिरवणुकी दरम्यान हरहर महादेव,छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय,जिजाऊ मा साहेबांचा विजय असो अशा घोषणांनी सर्व वातावरण शिवमय झाले होते. मिरवणूक संपवून शाळेत आल्यानंतर शिवरायांच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व पालकांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. पूर्व प्राथमिक विद्यामंदिर मांडा टिटवाळा या शाळेने शिवजयंती निमित्त काढलेली ही मिरवणूक म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा उपक्रम होता.