• Total Visitor ( 427943 )
News photo

जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेलीचे १२ वी परीक्षेत नेत्रदीपक यश

Raju tapal May 06, 2025 89

जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेलीचे १२ वी परीक्षेत नेत्रदीपक यश !



राजू टपाल.

टिटवाळा :- कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील अग्रगण्य असे जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालय गोवेली येथील विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी २०२५ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश मिळविले आहे. यंदा महाविद्यालयातून सर्वाधिक ६११ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचा एकूण ९९.०० % निकाल लागला आहे.

महाविद्यालयाचे शाखेनुसार विशेष प्राविण्य मिळवणारे गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे : 



कला शाखा ९६.७७ %

प्रथम - कु. शिसवे दिव्या नितलास - ८४.८३ %, 

द्वितीय - कु. टोहके कोमल प्रकाश - ८४.३३ %, 

तृतीय - कु. लोणे हर्षाली दिनेश  -  ७१.१७  %, 

चतुर्थ - कु. दळवी प्राची दिनेश  - ७०.८३ %,                                                                               



वाणिज्य शाखा ९८.१२ % 

प्रथम - कु. गुणाई तन्वी मारुती - ८७.८३  %, 

द्वितीय -कु. बोटकोंडले काजोल रमेश - ८६.८३ %, 

तृतीय -कु. शेख वाहेबा कादिर - ८४.०० %, 

चतुर्थ - कु.कोर भूमिका अंकुश - ७७.६७ %, 

पंचम - कु. शहाणे अथर्व विकास -  ७७.५० %



विज्ञान शाखा ९९.६४ %

प्रथम - शेख आफरीन फातिमा -  8८.०० %, 

द्वितीय - काटकर प्रणव रमेश -  ८५.०० %, 

तृतीय - मिश्रा नमन सरोज -  ८१.८३ %, 

चतुर्थ - फत्ता पियुष सुभाष -  ७९.१७ %, 

पंचम - गायकर वैष्णवी विकास -  ७८.३३ %



विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे सरांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात करीअर करता येईल, अशा जीवनदीप महाविद्यालय गोवेली, खर्डी, म्हसा येथे सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन आपले व आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहनही रविंद्र घोडविंदे सर यांनी केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement