निरोप तथा सत्कार समारंभ
माजी गटशिक्षणाधिकारी व माजी शालेय पोषण आहार अधिक्षक यांची बदली
अमरावती /भातकुली :- पंचायत समिती भातकुली गटशिक्षणाधिकारी दीपकजी कोकतरे यांची स्थानांतराने छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्याने तसेच शालेय पोषण आहार अधीक्षक (वर्ग 2) नरेंद्रजी गायकवाड यांची बुलढाणा येथे बदली झाल्याने पंचायत समिती शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, तसेच गटसाधन केंद्राच्या वतीने सत्कार तथा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला
या निरोप तथा सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थानी धामोरी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम.ठाकरे सर तर प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संतोषजी घुगे, स. प्रशासन अधिकारी संजय राठी,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वरजी माळवे , शिक्षण विस्तार अधिकारी शकील खान, पंजाबरावजी पवार,केंद्रप्रमुख नीता सोमवंशी,केंद्रप्रमुख नरेंद्र धनस्कर,किशोर रुपनारायण, उमेश चूनकीकर सर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तथा हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख रवींद्र धरमठोक यांनी करून सत्कारमूर्तींचे कार्यकाळातील कर्तव्यनिष्ठा,प्रामाणिकपणा , अधिकारी म्हणून काम करण्याची पद्धती, सर्वांसोबत मैत्रीपूर्ण व सलोख्यांचे संबंध इत्यादी विषयी माहिती दिली
यावेळी केंद्रप्रमुख उमेश चूनकीकर,लीना चारथळ,मुख्याध्यापिका चेचरे मॅडम,शिक्षण विस्तार अधिकारी पंजाबरावजी पवार इत्यादी मंडळींनी प्रतिक्रियाद्वारे सत्कार मूर्ती विषयी सदभावना मनोगत व्यक्त केले.
दोन्ही सत्कारमूर्तींनी सत्कारांच्या उत्तरांमध्ये सर्वांप्रती स्नेह व्यक्त करून विविध उपक्रमांमध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाचे नाव उंचावण्याकरिता आणि गुणवत्ता वाढीकरिता सर्वांचे सहकार्य लाभल्याचे शिक्षक तथा सर्व कर्मचारी मंडळींचे ऋण व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांविषयी ठाकरे सर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्यपूर्ण कार्यां विषयी गौरवोद्गार तसेच ऋण व्यक्त केलेत.
कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्रजी दहातोंडे केंद्रप्रमुख भातकुली यांनी करून आभार प्रदर्शन संतोष राऊत सर यांनी केले
कार्यक्रमाकरिता पंचायत समिती अंतर्गत विविध संघटना प्रतिनिधी, गटसाधन केंद्रातील तसेच शिक्षण विभागातील कर्मचारी तसेच शिक्षक अनिस शेख सर भालसी,शेख शकील सर कुंड,शफिक सर खोलापूर,प्रफुल वाठ सर,संतोष कावलकर सर,दीपक चिंचे सर, पंकज दहिकर सर,शैलेश मांडले सर आसरा,राधेश्याम लाहोटी सर,नवेद सर इ.बहुसंख्य शिक्षक तथा कर्मचारी उपस्थित होते.असे प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
=====================