• Total Visitor ( 435906 )
News photo

गुजर प्रशालेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

Raju tapal June 16, 2025 117

गुजर प्रशालेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत सोमवार दिनांक १६ जून २०२५ रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे व पाचवी साठी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेच्या वतीने अत्यंत अनोख्या पद्धतीने करण्यात आले. 

यावेळी प्रशालेने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेच्या प्रवेशद्वारावर फुगे,फुलांच्या आकर्षक सजावटीने तसेच रांगोळी काढून प्रशालेचे सुशोभीकरण करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन व त्यांचे औक्षण करून शाळेच्या पहिल्या दिवसासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देवून त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ ढमढेरे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रशालेत आवर्जून उपस्थित होते.

 विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अत्यंत लोकप्रिय असे कार्टून मिकी माऊस व मिनी माऊस यांचे पेहराव घालून विद्यार्थ्यांचे आनंदित वातावरणात स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस होते त्या सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस केक कापून संगीताच्या तालावर साजरे करण्यात येवून  विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करून त्यांना वही व पुस्तकाचे आकर्षणाबद्दल प्रोत्साहन निर्माण करण्यात आले.

त्याचप्रमाणे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रशालेत विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रशालेतील चित्रकलेच्या उपक्रमशील शिक्षकांनी बनवलेल्या उगवते कलाकार या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा शाळेच्या पहिल्या दिवशी संपन्न झाला. 

या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे मानद सचिव अरविंद ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे,प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक,गावातील गावकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापूरी ता.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement