• Total Visitor ( 693823 )
News photo

योगिता भुसारी यांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’

Raju Tapal publisher September 06, 2026 21

योगिता भुसारी यांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’



विद्यार्थी हेच दैवत मानणारे शिक्षक यांचा शिक्षक दिनी जिल्हा परिषद शाळा अडगावाच्या शिक्षिका योगिता भुसारी(फुटाणे) यांचा सन्मान



अमरावती:- शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यातील ४२ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. अडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका योगिता भुसारी(फुटाणे) यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षकांचे व्यासपीठ असलेले ‘शिक्षक ध्येय,साई समर्पण संकल्प नांदेड,विलास नामदेवराव व्हटकर मुंबई,यशिता गार्डन नर्सरी हिंगणघाट,जि.वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था,होडगाव (कोंड),ता.माणगाव,जि.रायगड’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत राज्यातील शिक्षकांमधून दोन गटांत स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात (अंगणवाडी ते सातवी) २८ शिक्षक,तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (आठवी ते पदवीपर्यंत) १४ शिक्षक,असे एकूण ४२ विजेते शिक्षक निवडण्यात आली होती. या सर्व शिक्षक,शिक्षिका यांचा ५सप्टेंबरला शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह आणि प्रमाणपञ देऊन सन्मान करण्यात आला.प्राथमिक गटातील विजेत्यांमध्ये जिल्हा परीषद शाळा अडगावच्या शिक्षिका योगिता भुसारी,अमरावती यांचे मुख्याध्यापक फेरन सर,दानखेडे सर,केन्द्रसमन्वयक उमेश वानखेडे सर,संपूर्ण पालक वर्ग, विद्यार्थी,अंगणवाडी सेविका मोहोड ताई,सर्व स्तरातुन अभिनंदन करण्यात आले आहे.हा पुरस्कार माझा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा आहे,मी त्यांना समर्पित करीत आहे,असे प्रतिपादन पुरस्कारर्थी योगिता भुसारी यांनी सांगितले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026