कांटा लगा' गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे निधन
मुंबई:- 'कांटा लगा' या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या ४२ व्या शेफाली जरीवाला हिनं मुंबईत अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या धक्क्यानं शेफाली जरीवाला हिचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शेफालीच्या मृत्यूने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कांटा लगा गाण्यामुळे रातोरात स्टार झालेली शेफाली जरीवालाच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन विश्वात मोठी शोककळा पसली आहे. 2002 साली आलेल्या या गाण्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळं नाव आणि चेहरा मिळाला. या गाण्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. हे गाणं इतकं फेमस झालं की तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दरम्यान, शेफालीला ‘कांटा लगा’ या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. पराग व शेफालीने ‘नच बलिए’ या डान्स रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला होता. तसेच शेफालीने सलमान खान, अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात खास भूमिका केली होती.
शेफालीला तिचा पती, अभिनेता पराग त्यागीने तातडीने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर, तिचा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. असे समजते. शेफालीच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. शेफाली रातोरात स्टार झाली होती. त्यानंतर ‘मुझसे शादी करोगी’, ‘नच बलिए’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या कार्यक्रमांमध्येही ती झळकली. सोशल मीडियावरही शेफाली कायम सक्रिय होती आणि मानसिक आरोग्य तसेच महिलांच्या हक्कांसाठी तिने आवाज उठवला होता. शेफाली जरीवालाच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतील एक तेजस्वी, बिनधास्त आवाज हरपला आहे.