• Total Visitor ( 84397 )

142- कल्याण पूर्व विधानसभा मतदार  संघ अंतर्गत स्वीप पथकामार्फत विविध महाविद्यालय आणि  शाळेमध्ये संकल्प पत्र वाटप करून जनजागृती कार्यक्रम

Raju tapal October 23, 2024 20

 142- कल्याण पूर्व विधानसभा मतदार  संघ अंतर्गत स्वीप पथकामार्फत विविध महाविद्यालय आणि  शाळेमध्ये संकल्प पत्र वाटप करून जनजागृती कार्यक्रम ! 

 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक ) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली विविध महाविद्यालय  आणि महापालिका शाळा, खाजगी शाळा येथे जाऊन विद्यार्थ्यांना संकल्प पत्र देऊन पालकांना मतदान करणेबाबत  जनजागृती करण्यात आली. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले आणि शाळांमध्ये जमा करण्यात आले. महाविद्यालयातील  प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांना  मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदान करणे बाबत आव्हान केले. त्याचप्रमाणे   महानगरपालिका  शाळा क्रमांक 18 तिसगाव, महापालिका शाळा क्रमांक 26 जाऊबाई, सम्राट अशोक विद्यालय, समर्थ विद्यालय, मा दुर्गा विद्यालय,संकल्प विद्यालय, महानगरपालिका शाळा क्रमांक 69, मिलिंद नगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी, पोस्टर चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती केली.  सदर ठिकाणी मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी  मतदान करणेबाबत विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि प्रभात फेरी द्वारे नागरिकांना मतदान करणे बाबत आवाहन करण्यात आले.    

सदर समयी स्वीप टिमचे कर्मचारी  विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, समाधान मोरे, जितेश म्हात्रे,आदित्यी पवार, प्रतीक्षा भोईर, प्रियांका पडवळ,भारती डगळे,शिरीष म्हात्रे उपस्थित होते.
 

Share This

titwala-news

Advertisement