• Total Visitor ( 84235 )

 142 कल्याण पूर्व मतदार संघात मतदान जनजागृती साठी बाईक रॅलीचे आयोजन

Raju tapal November 18, 2024 6

 142 कल्याण पूर्व मतदार संघात मतदान जनजागृती साठी बाईक रॅलीचे आयोजन

     142 कल्याण पूर्व  त्याअनुषंगोन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 142 कल्याण पूर्व विघानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी विविध जनजागृतीपर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. याच अनुषंगाने आज 142 कल्याण पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ  आणि सहा. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली  स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक ) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांनी आज 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात  ज्या मतदारसंघात कमी मतदान झालेलं आहे त्या मतदारसंघ व परिसरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.   सदर बाईक रॅली ही 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ येथून चक्की नाका मार्गे भाल या शाळेतील जे सी एस  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाल  या परीसरत सदर  रॅलीचे मोठ्या  उत्साहात स्वागत करून आणि मतदान  जनजागृती पर घोषना देऊन मोठ्या उस्तहात  सदर रॅलीचे  स्वागत  केले.  सदर रॅली ही  नेवाली  नाका मार्गे हाजी मलंग बस स्टॉप येथे जाऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांना मतदान जनजागृती शपथ 
देण्यात आली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या नागरिकाची मानवी साखळी तयार  करून मतदान जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सदर रॅली ही नेवाली नाका मार्गे  वसार गाव येथून मानेरे गाव येथील जिल्हा परिषद या शाळेपाशी थांबून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सदर रॅलीच  मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन स्वागत केले. 
तद्नंतर सदर रॅली ही श्रीराम चौक येथे थांबून सदर परिसरात मोठ्या प्रमाणात  घोषणा देत नागरिकांना मतदान करणे बाबत आवाहन करण्यात आले. त्यानंतर सदर रॅलीची समाप्ती ही
  142 कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ या  कार्यालयात  आली. सदर परिसरात मोठया प्रमाणात लाऊडस्पिकरव्दारे  मतदान जनजागृतीपर गीत वाजवून नागरीकांना  
मतदान  करणेबाबत आवाहन करण्यात आले. यासमयी  विविध शाळेतील  शिक्षक वर्ग , आर एस पीचे कर्मचारी वर्ग,कल्याण जनजागृती टीमचे सभासद तसेच मैत्री फाऊडेशनचे सभासद  तसेच  स्वीप टिमचे कर्मचारी  विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, समाधान मोरे, रवींद्र तवर भारती डगळे, इलेक्शन युवा आयकॉन प्रणव देसाई,सिने अभिनेता सुशील राठोड   तुळशीराम झोपे शिरीष म्हात्रे इ. आणि इतर कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 

Share This

titwala-news

Advertisement