• Total Visitor ( 551640 )
News photo

नायगाव फाटा येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता 

Raju Tapal publisher May 30, 2026 30

नायगाव फाटा येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता 

      

शिरूर:- नायगाव फाटा हद्दीतील श्रेयस रोज नर्सरी येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे.

संदीप शामराव शिंदे वय -४१ रा.श्रेयस रोज नर्सरी नायगाव फाटा ता‌.हवेली जि‌.पुणे हे त्यांच्या कुटूंबासह नर्सरीच्या‌ ठिकाणी राहात असून गुरुवारी दि.२१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांची पत्नी नर्सरीमध्ये काम करत होते.त्यावेळी त्यांचा मुलगा पियुष शिंदे वय -१६ वर्षे १० महिने हा घरात होता‌. पियुषचे त्याच्या लहान भावासोबत भांडण झाल्याने त्याची आई त्याला म्हणाली घरात लहान भावासोबत भांडण करू नको. आईच्या या बोलण्याचा राग आल्याने पियुष कोणाला काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला.नातेवाईकांनी तसेच मित्रपरिवाराने आजूबाजूच्या परिसरात शोध घेवूनही कोठेही न सापडल्याने मुलाच्या पालकांनी उरूळीकांचन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पियुष संदीप शिंदे याचे वर्णन पुढीलप्रमाणे:- उंची ४ फूट,रंग गोरा,बांधा सडपातळ,पांढ-या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली,पायात निळ्या रंगाचे सॅण्डल घातलेले आहेत. डोक्यात जुन्या जखमेची खूण असून उरूळी कांचन पोलीस तपास करत आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement