• Total Visitor ( 702798 )
News photo

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला ३ मीटरचे भगदाड

Raju Tapal publisher July 18, 2026 55

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला ३ मीटरचे भगदाड



जागतिक वारसा स्थळाच्या सुरक्षेबाबत शिवप्रेमींमध्ये चिंता!



मालवण:- गेल्या साडेतीनशेहून अधिक वर्षे समुद्राच्या अथांग लाटांशी झुंज देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी आरमाराची साक्ष देणारा ऐतिहासिक ‘किल्ले सिंधुदुर्ग’ सध्या शासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. किल्ल्याच्या पूर्वेकडील उजव्या बाजूच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या भिंतीला पाव्याच्या ठिकाणी तब्बल तीन मीटर रुंदीचे मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भगदाडामुळे आजूबाजूचे दगडही कोसळण्याच्या स्थितीत असून,संपूर्ण भिंतीलाच मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान मिळालेल्या या किल्ल्याच्या दुरवस्थेमुळे शिवप्रेमी, किल्ले प्रेमी आणि स्थानिक रहिवाशांमधून तीव्र चिंता व संताप व्यक्त होत आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026