• Total Visitor ( 429387 )
News photo

मिरा भाईंदर मध्ये ९७६ मतदान केंद्र निश्चित.

Raju tapal December 17, 2025 38

मिरा भाईंदर मध्ये ९७६ मतदान केंद्र निश्चित.



मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी १९८ ठिकाणी एकूण ९७६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधांची तयारी सुरू असून सुमारे आठ लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत.

भाईंदर :- आगामी महापालिका निवडणुकीसाठी १९८ ठिकाणी ९७६ मतदान केंद्रे उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार केंद्रात आवश्यक गोष्टीच्या उभारणीकडे प्रशासनाकडून काम केले जात आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यंदा या निवडणुकीत ८ लाख ९ हजार १५१ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ४ लाख ३३ हजार ५३ इतके पुरुष आणि ३ लाख ८६ हजार ७८ तर २० हे इतर आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून मतदानाच्या दृष्टीने आवश्यक उपायोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यावेळी सात ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तर १९८ ठिकाणी ९७६ मतदान केंद्र उभारले जाणार आहे. यामध्ये मतदारांना आवश्यक असलेल्या गोष्टीची उभारणी करण्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. प्रामुख्याने तब्बल आठ वर्षानंतर महापालिका निवडणुका होत आहेत. यात एकूण २४ प्रभागात ९५ नगरसेवक निवडले जाणार आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement