पिंपरखेड येथे लावलेल्या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद
शिक्रापूर (प्रतिनिधी):- पिंपरखेड येथे वनखात्याने लावलेल्या पिंज-यात बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील पाच वर्षीय शिवन्या बोंबे हिचा झाडीतून आलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला होता.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून घटनास्थळी वेगवेगळ्या ठिकाणी १० पिंजरे लावण्यात आले होते.घटनास्थळी लावण्यात आलेल्या एका पिंज-यात सोमवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला.पिंज-यात जेरबंद झालेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबटनिवारण केंद्रात सोडण्यात आले.