• Total Visitor ( 429703 )
News photo

शिक्रापूर विद्याधाम प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न 

Raju tapal May 20, 2025 181

शिक्रापूर विद्याधाम प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न 



वृक्षलागवड,भजनाने कार्यक्रमाची सांगता 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेच्या सन १९९०/९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ३३ /३४ वर्षानी अतिशय उत्साहात पार पडला.

विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शाळेचे गुरुवर्य आदरणीय ह.भ.प. महादेव बांगर सर, बाबुराव अर्जूनराव साकोरे सर,सूर्यकांत शिर्के सर,जांभेकर मॅडम उपस्थित होत्या. सामाजिक जीवनामध्ये व वैयक्तिक जीवनामध्ये विद्यार्थी यशस्वी झाल्याबद्दल सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पाल्य उच्चशिक्षित झाल्याबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले या पुढील काळामध्ये निरोगी आयुष्य जगण्या करिता आवश्यक असलेल्या सूचना सुद्धा त्यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या 

सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्वांना आरोग्यविषयक टिप्स के,ई.एम हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या मंगल सासवडे, शिक्रापूर येथील पी.एस.सी मध्ये कार्यरत असलेल्या आशा वर्कर कल्पना सासवडे,ढोकले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले  शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच रमेश गडदे, कासारी गावचे माजी सरपंच राजेंद्र रासकर, सणसवाडी गावचे माजी सरपंच राजेंद्र हरगुडे, शिक्रापूर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, शिक्रापूर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अनिल राऊत तसेच शिक्षण क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रामध्ये व कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी जयश्री धुमाळ व धर्मराज बोत्रे,सरपंच रमेश गडदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय चव्हाण गुरुजी यांनी केले.सरपंच रमेश गडदे यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले.तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश गायकवाड, शैलेश मांढरे, व शेखर हिरवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी देवाज्ञा झालेले गुरुवर्य तसेच जे विद्यार्थी हयात नाहीत त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

वृक्ष लागवड करून, भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर जि.पुणे)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement