• Total Visitor ( 702766 )
News photo

संकटकाळात निमोणे ग्रामस्थांकडून माणुसकीचे दर्शन 

Raju tapal June 14, 2025 108

संकटकाळात निमोणे ग्रामस्थांकडून माणुसकीचे दर्शन 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- संकटकाळात अडचणीत असलेल्या कुटूंबाला आर्थिक मदत करून शिरूर तालुक्यातील निमोणे ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील हाॅटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा कर्डे चौकात ९ जूनला अपघाती मृत्यू झाला. थोरात यांच्या अपघाताची बातमी "टिटवाळा न्यूज" ने १० जून २०२५ रोजी "अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू "या शिर्षकाखाली प्रसिद्ध केली होती.

थोरात कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने निमोणे ग्रामस्थांनी आर्थिक मदत उभी करून थोरात कुटूंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

निमोणे गावातील ग्रामस्थांनी सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातून थोरात कुटूंबियांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.

सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळून गावक-यांनी माणुसकी दाखवत आॅनलाईन आणि रोख स्वरूपात १ लाख ३२ हजार ६४० रूपयांची मदत गोळा करून दशक्रिया विधी वेळी थोरात कुटूंबियांकडे सुपूर्द केली.

तुमच्या साथीने आम्हाला सावरण्याचे बळ मिळेल अशा भावनिक शब्दांत बाळासाहेब थोरात यांचे पुत्र चेतन थोरात,शुभम थोरात यांनी गावक-यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026