• Total Visitor ( 430175 )
News photo

नेरूर मध्ये आज रविवारी रंगणार भव्य नरकासुर स्पर्धा..

Raju tapal October 19, 2025 90

नेरूर मध्ये आज रविवारी रंगणार भव्य नरकासुर स्पर्धा..



तर बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य बैल सजावट स्पर्धेचेही करण्यात आले आहे आयोजन... रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत भव्य स्पर्धाचे आयोजन..



कुडाळ:- रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धा 2025 वर्ष पहिले रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत बैल मालक प्रकाश साऊळ,आजीम मुजावर,भाई नारिंग्रेकर,विशाल नाईक,बाळा रेवंडकर,आनंद लिंगे,अवि शिरसाट,स्वप्निल नेरुरकर,बाळा नांदोसकर,बाबी साऊळ,आदी बैल मालक सहभागी असणार आहेत.या स्पर्धेत कलेश्वर मंदिर नेरूर ते नेरूर चव्हाटा बैलांची रॅली अशा स्पर्धा होणार संपन्न...... रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत नेरुर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वरभव्य नरकासुर स्पर्धा 2025 वर्ष पहिले रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे,त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी भव्य बैल सजावट स्पर्धा २०२५ या स्पर्धेत बैल मालक प्रकाश साऊळ,आजीम मुजावर भाई नारिंग्रेकर,विशाल नाईक,बाळा रेवंडकर,आनंद लिंगे,अवि शिरसाट,स्वप्निल नेरुरकर,बाळा नांदोसकर,बाबी साऊळ,आदी बैल मालक सहभागी होणार आहेत.या स्पर्धेत कलेश्वर मंदिर नेरूर ते नेरूर चव्हाटा अशी बैलांची रॅली स्पर्धा संपन्न होणार आहे. रणझुंझार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत नेरूर पंचक्रोशी मर्यादित कलेचा देव कलेश्वर भव्य नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 12000/- व आकर्षक चषक व्दितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 7000/- व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 4000/- व आकर्षक चषक तसेच उत्तेजनार्थ इतर सर्व सहभागी मंडळांकरिता रोख रक्कम रुपये 1000/-



स्पर्धा नियमावली



१) नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी ........ वाजेपर्यंत आणणे बंधनकारक राहील... .... नंतर नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी आल्यास दहा गुण  कमी करण्यात येतील..

२ ) सादरीकरणात नरकासुराचा वध करणे आवश्यक आहे.

३) कथा पौराणिक कथेचा आधार घेऊन करावा गरजे नुसार थोडाफार बदल करण्यास हरकत नाही 

४) सादरीकरणाची वेळ प्रत्येक संघासाठी जास्तीत जास्तीत 10 मिनिटे देण्यात येईल.

५)ही स्पर्धा नेरूर पंचक्रोशी मर्यादित राहील.

६) स्पर्धा चालू झाल्यानंतर सादरीकरण एकदाच करता येईल.

७)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील



स्पर्धेचे गुणपत्रक



१)नरकासुर प्रतिमा -20 गुण 

२)वेशभूषा/रंगसंगती -10 गुण 

३)चल चित्र -10 गुण 

४) नाविन्यपूर्ण/ वैशिष्ट्यपूर्ण -10 गुण 

५)सादरीकरण/ नरकासुर वध -30 गुण 

६)नरकासुर स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर आणणे -10 गुण 

७)विषय/ प्रश्नोत्तर -10 गुण



एकुण १०० गुण



तरी नेरूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर यांनी केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement