• Total Visitor ( 428830 )
News photo

आंधळगाव गावाचे नाव दर्शविणारा फलक उलट दिशेने 

Raju tapal February 09, 2026 33

आंधळगाव गावाचे नाव दर्शविणारा फलक उलट दिशेने 





शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील आंधळगाव गावाचे नाव दर्शविणारा फलक न्हावरे गावाच्या दिशेने प्रवास करताना रस्त्याच्या उजव्या बाजूला उभारलेला असून हा फलक उलट दिशेने लावलेला आहे. आंधळगाव हे गाव क्रिकेट महर्षी दि.ब.देवधर यांचे गाव असल्याचे ऐकिवात आहे. आंधळगाव गावाचे नाव दर्शविणारा फलक वडगाव रासाई गावावरून न्हावरे‌ गावाच्या दिशेने प्रवास करताना आंधळगाव ओलांडल्यानंतर वळण रस्त्याच्या कडेला वाहनचालकांना दिसून येत आहे. न्हावरे गावावरून वडगाव रासाई गावाच्या दिशेने प्रवास करताना आंधळगाव गावाच्या अलिकडे वळण रस्त्याच्या अलिकडे डाव्या बाजूला आंधळगाव गावाचे नाव दर्शविणा-या फलकाची पाठीमागील बाजूस वाहनचालकांना दिसून येत आहे. हा फलक आहे त्याच जागेवरच फिरवून लावल्यास आंधळगाव पुढे आहे हे न्हावरे‌ गावावरून वडगाव रासाई गावाच्या दिशेने प्रवास करणा-या वाहनचालक तसेच प्रवाशांच्या लक्षात येईल. दरम्यान या फलकापासून थोडे पुढे गेल्यानंतर आंधळगाव गावाजवळ छोटासा पूल असून या पुलाजवळ संपूर्ण पुलावर रेषेसारखा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यातून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. आंधळगाव गावाजवळ वळण रस्त्यावरही खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. आंधळगाव गावाचे नाव दर्शविणा-या फलकाची दुरूस्ती करण्याबरोबरच आंधळगाव येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचीही दुरूस्ती करणे अतिशय गरजेचे आहे.

               


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement