• Total Visitor ( 430504 )
News photo

गुजर प्रशालेत गुरुपौर्णिमेचा अनोखा सोहळा संपन्न        

Raju tapal July 10, 2025 105

गुजर प्रशालेत गुरुपौर्णिमेचा अनोखा सोहळा संपन्न        



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेचा सोहळा विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

हिंदू संस्कृतीतील आद्य गुरु व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे जेष्ठ शिक्षक विजय राऊत, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे पर्यवेक्षक मोहन ओमासे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पाडला. 

यावर्षी गुरु पौर्णिमेनिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम केला. प्रशालेतील सर्व शिक्षकांचे प्रशालेच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधींनी पाद्य पूजा व औक्षण करून त्यांचा सत्कार केला व त्यांचे शुभाशीर्वाद संपूर्ण प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका जया पुजारी यांनी केले. प्रशालेतील विद्यार्थिनी आरोही थोरात व यशदा थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

 देविका तोडकर व अनुष्का शेळके या विद्यार्थिनींनी गुरूपौर्णिमेबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रशालेचे उपशिक्षक जालिंदर आखाडे यांनीही गुरुपौर्णिमेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. आधुनिक काळात गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रशालेचे उपशिक्षक गौतम जाधव यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रशालेच्या हर्षाली भोईटे यांनी मानले. 

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याचे कौतुक शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी केले व सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement